आपण care taker किंवा आपण रखवालदारच आहोत
एक काल्पनिक कथा
मित्रांनो आपण विचारच करू शकत नाही एवढ्या वर्षांपूर्वी अवकाशात देवांचे राज्य होते
तर ते देव कोण होते तर सूर्य देव, शनी देव, ब्रह्म, विष्णू आणि महेश आणि ईतर देव.
या देवांचे खूप छान चालले होते. सर्व देव खूप आनंदाने राहत होते. आज जसे आपण आपल्याला मानव म्हणवून घेतो, तेव्हा त्यावेळी देव होते.
देव अवकाशातच राहत असत आणि तिथेच फिरायचे. एकदा फिरता फिरता कोणा ऐका देवाला पृथ्वीचा शोध लागला. आता पृथ्वीचा शोध लागला म्हणजे काय तर देवाने तिला पृथ्वी हे नाव दिले.
पृथ्वीवर हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि झाडे-फळे-फुले होती.
आणि त्यामुळे सर्व देव पृथ्वीवर फिरायला यायचे. हळूहळू पृथ्वी फिरण्याचे ठिकाण म्हणून प्रचिती झाली.
देव तर आता खूपच आनंदी होते आणि ते पृथ्वीवर खूप मज्जा करायचे आणि पृथ्वीची काळजी देखील घ्यायचे. पण पृथ्वीची एवढी काळजी घेऊन सुद्धा तिथे थोडी स्वच्छता कमी दिसू लागली.
मग देवांची मिटिंग झाली की एवढी सुंदर पृथ्वी जर आहे तर तिची आपण काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून देवांनी शेवटी असा निर्णय घेतला की पृथ्वीवर आपण एक care taker ठेवूया जो पृथ्वीची काळजी घेईल. आणि त्याप्रमाणे पृथ्वीवर care taker ठेवण्यात आला.
याच care taker ला देवांनी पुढे मानव हे नाव दिले
आणि अश्या प्रकारे मानवाचा पृथ्वीवर जन्म झाला. आता मला वाटते पुढची कथा तुम्हाला कळली असेलच.
तर पुढची कथा अशी आहे की
हा मानव आपले खूप सुंदर कार्य करत होता आणि सर्व देव त्याच्याकडून सर्व कामे करुन घेत होते आणि हा सर्व remote देवांच्या हातातच होता की ज्याला आता आपण कुंडली म्हणून मानतो.
पुढे या मानवाने काम करता करता देवाकडे ईच्छा व्यक्त केली की देवा तुमचा चांगला timepass होतो पण माझे काय? आणि त्याने देवाजवळ कुणी ऐका जोडीदाराची आणि कुणीतरी सोबतीची मागणी केली.
मग देवांनी पुन्हा मिटिंग घेतली आणि जोडीदार देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा देवांना असे वाटले की आपण जर याला विरुद्ध लिंगी जोडीदार दिला तर अधिक मानव तयार होतील आणि त्या एकट्या मानवाचा पृथ्वीला स्वच्छ ठेवण्याचा किंवा तिची निगा राखण्याचा भार कमी होईल आणि देवांनी त्या मानवाला विरुद्ध लिंगी जोडीदार दिला आणि अश्या प्रकारे मानव निमिर्ती झाली.
म्हणजेच पूर्वी पृथ्वीवर एकच मानव होता जो कार्य करायचा, त्याला आपण कर्ता पुरुष बोलतो आणि याच कर्त्या पुरुषाची कर्तव्य पुढच्या पिढीला वेळोवेळी सांगितली गेली आणि त्या प्रमाणे ती पाळली गेली आणि ज्याला आता आपण निसर्ग बोलतो तो टिकून राहिला.
पण त्या care taker ची कर्तव्य आणि त्याच्या कामाच्या गोष्टी हळूहळू फुसट झाल्या त्यामुळे पृथ्वीवर रामायण-महाभारत आणि बऱ्याच गोष्टी घडल्या तसेच खूप युद्ध झाली आणि जेव्हा जेव्हा निसर्गाची हानी करण्याचा ज्या मानवाने प्रयत्न केला त्याला देवाने त्याच्या कुंडली या remote माध्यमातून त्याला धडा शिकवला आहे.
ज्या प्रमाणे आपण आपल्या गावच्या घरी किंवा फार्महाउसला care taker ठेवतो, त्याप्रमाणे मित्रांनो या पृथ्वीवर आपण care taker म्हणूनच राहत आहोत.
आपल्याला देवाने रखवालदार म्हणूनच पृथ्वीवर पाठवले आहे. त्यामुळे पृथ्वीची आणि निसर्गाची काळजी घेणे आणि तिची स्वच्छता राखणे हे मानवाचे प्रथम कर्तव्यच आहे आणि जो कोणी हे कर्तव्य पाळत नाही त्याचा विनाशच होतो
त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो
तुम्हा सर्वाना माझी विनंती आहे कि
निसर्गाच्या विरुद्ध जाणारा
प्रत्येक धर्म
आणि
प्रत्येक देश चुकीचाच आहे
त्यामुळे
निसर्ग टिकवणे
आणि
त्याची काळजी घेणे
हे मानवाचे प्रथम कर्तव्यच आहे
तसेच
मरणापर्यंत साथ देणाऱ्या
प्रत्येक नात्याची साथ निभावणे
हे देखील मानवाचे प्रथम कर्तव्यच आहे
👍🏻
राशी, कुंडली आणि ग्रह
मार्गदर्शक
निलेश ठावरे
9870245805