अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खुशाल काम करावे
पण जी लोक अशिक्षित आहेत आयुष्यात साधी दहावी सुद्धा पास होऊ शकलेले नाहीत अशी लोक आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मार्ग काढण्यासाठी बाबा लोकांकडे जातातच
यात त्यांचा काहीच दोष नाही आणि नेमक्या अशाच अशिक्षित लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोक त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात हे सर्व चमत्कार नसून ही सर्व हात चलाखी आहे
चला आम्ही मानतो की हि सर्व हाथचलाखी आहे पण त्या अशिक्षित लोकांना दुसरा पर्याय नसतो त्या अशिक्षित लोकांची मानसिकता फार कमजोर असते ते सुशिक्षित लोकांसारखे विचार करू शकत नाहीत तसेच त्यांच्याकडे खर्च करायला तेवढा पैसा देखील नसतो
त्यामुळे ते स्वतःच्या हेअल्थची आणि फायनान्सची काळजी कशी घ्यायची हे त्यांना कळतच नाही
त्यामुळे त्यांना फसवणारे लोक जीवनात खूप भेटतात पण त्याला पर्याय नाही
कारण समाजात सुशिक्षित पेक्षा अशिक्षित लोक जास्त आहेत
कदाचित अशिक्षित म्हणजे काय, ज्याला हेल्थ आणि फायनान्स याची व्याख्याच माहित नाही ते सर्व अशिक्षितच आहेत अशी सर्व लोक अंधश्रद्धेला बळी पडतात
पण कदाचित यात त्यांचा काहीच दोष नाही, कारण माणसाच्या मानसिकतेनुसार माणसाला सर्व गोष्टी जीवनात सोप्या हव्या असतात
आणि त्या तो गोष्टी सतत सातत्याने मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे आयुष्यात येणारे अपयश, संकटे , आजार दूर करण्यासाठी किंवा त्यातून बाहेर निघण्यासाठी तो अशिक्षित माणूस ज्याला तुम्ही अंधश्रद्धा मानणारे म्हणता त्याला बळी पडतो
पण मी इथे पुन्हा सांगेन की त्याला पर्याय नाही
कारण शेवटी प्रत्येक गोष्टीत बिझनेस आहे असे किती बिजनेस तुम्ही बंद करणार आहात?
जर कोणाला त्या गोष्टी करून तात्पुरते सुख मिळणार असेल किंवा उपाय मिळणार असेल तर काय हरकत आहे
थोडक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पाठिंबा देणारे लोक खूप कमी आहेत कारण जगात सुशिक्षित लोकांची संख्या फार कमी आहे म्हणून जे चाललंय ते चालू द्या त्यात लोकांना आनंद आहे किंवा अशा लोकांना तुम्ही किती सुशिक्षित करणार आहात आणि ते शक्य नाही
आणि हो…. राजकारणातील लोक सुद्धा अंधश्रद्धा पाळतात
म्हणजे जी लोक आपला देश चालवत आहेत ते सुद्धा अंधश्रद्धा पाळतात त्या राजकारणी लोकांना तुम्ही सुधारू शकणार आहात का? तर नाही
मग सामान्य माणसाने अंधश्रद्धा पाळली तर त्यात नवल काय?
एखादा बाबा आपली प्रचार सभा भरून लोकांना एकत्रित आणून आणि आकर्षित करून जर अशिक्षित लोकांना काही गोष्टी सांगत असेल तर त्यात वाईट काय?
कारण त्यांना त्यात सुख मिळते समाधान मिळते
खरं सांगायला गेलो तर जगात एकही माणूस असा नाही कि जो अंधश्रद्धा मानत नाही
प्रत्येक माणसाच्या मनात एक ना एक तरी अंधश्रद्धा असतेच
हा एक सायकॉलॉजीचाच भाग आहे
त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही पुन्हा एकदा या सर्व गोष्टीवर अभ्यास करा आणि लोक असे का करतात याचा अभ्यास करा लोकांच्या सायकॉलॉजीचा अभ्यास करा
कारण अंधश्रद्धेला पाठिंबा देणारे लोक भरपूर आहेत आणि का लोक अंधश्रद्धेला बळी पडतात याचा सुद्धा अभ्यास करा. आणि मग लोकांना त्यातून बाहेर काढण्याचे काम करा
ही नम्र विनंती.
प्रत्येक वाईट गोष्टीत प्रकाश पाडणे हे गरजेचे आहे अर्थात हे सुंदर कार्य आहे पण कुठेतरी माणसाच्या सायकॉलॉजीचा सुद्धा अभ्यास करायला हवा
कारण प्रत्येकाची एक जीवनशैली असते प्रत्येक माणूस श्रीमंत नसतो किंवा प्रत्येक माणूस सुशिक्षित नसतो आणि पैसा मिळवण्यासाठी माणूस अंधश्रद्धेला बळी पडतो आणि आयुष्यात पैसा हा खूप गरजेचा आहे त्यामुळे यात लोकांची काहीच चूक नाही.
अंधश्रद्धा निर्मूलनचे अधिकारी आणि कार्यकर्ते खूप छान कार्य करतात पण गरीब लोकांचा सुद्धा विचार करावा कारण ते विचारांनी अशिक्षित आहेत आणि ते कधीच सुशिक्षित होऊ शकत नाहीत कारण आयुष्यात साधी दहावी पास करू शकले नाहीत त्या लोकांना अंधश्रद्धा हा विषय कसा कळणार?
त्यांना तो चमत्कारच वाटणारच
कारण त्यांना आयुष्यात सर्व आयते हवे असते अशा लोकांना तुम्ही काय सुधारणार?
कारण समाजात लोकांना चांगले आणि वाईट यातला फरकच माहित नाही.
मग तीच लोक अशा अंधश्रद्धेकडे वळतात आणि म्हणूनच हजारो वर्षापासून आजपर्यंत अंधश्रद्धा ही प्रत्येकाच्या मनामनात 100% आहे फक्त प्रत्येक माणूस त्या अंधश्रद्धेसाठी कुठे पैसा खर्च करतो तर कुठे फुकट आपले फायदे करून घेतो आणि आपल्या मनाचे समाधान करतो आणि आपला स्वार्थ पूर्ण करतो
सर्वात महत्त्वाचे म्हणजे
आपल्या मनाचे समाधान करणे हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे आणि म्हणून कळत नकळत माणूस अंधश्रद्धेकडे वळतो
अंधश्रद्धा दूर कधीच होणार नाही कारण लोक सुशिक्षित बनू शकत नाहीत कारण प्रत्येकाला स्वार्थ असतो ही सायकॉलॉजी आहे आणि त्यामुळे कमी मेहनत करून आपण आपली प्रगती कशी करू हे प्रत्येक माणसाला वाटत असते अशा मानसिकतेला आपण बदलू शकत नाही तसेच अशा अंधश्रद्धेला कोणीच काही करू शकत नाही
मला तरी असे वाटते कि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिथे खरोखर गरज आहे तिथेच आपले कार्य करावे कारण तुम्ही किती मेहनत घेतलीत तरी लोक सुधारणार नाहीत
आणि हा… तुम्ही कोणा कोणाला सुधारणार आहात कारण सर्व लोक सुशिक्षित नाहीत
सुशिक्षित म्हणजे मिळवलेल्या डिगऱ्या नव्हे तर
हेल्थ आणि फायनान्सचे ज्ञान असणे होय 👍🏻
निलेश ठावरे
9870245805